खुशखबर! जळगावहून आता दररोज गोवा-हैदराबादसाठी विमानसेवा सुरु होणार

जळगाव । जळगावकरांसाठी एक खुशखबर आहे. जळगाव विमानतळावरून दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी फ्लाय ९१ या विमान कंपनीने हिवाळी वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे.त्यामुळे हिवाळ्यात गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्यांना आता दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उडान ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीने गोवा-जळगाव- हैदराबाद व गोवा-जळगाव-पुणे अशी विमान सेवा सुरू केली आहे. गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर गोवा-जळगाव-पुणे ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे.

फ्लाय ९१ कंपनीने आता हिवाळी वेळापत्रक तयार केले असून यात गोवा-जळगाव- हैदराबाद ही विमान सेवा २७ ऑक्टोबर ते २९ मार्च २०२५ दरम्यान दररोज असणार आहे. तर पुणे व मुंबई सेवा कधी नियमित सुरू होणार? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.