खुशखबर ! भारतीय विमानतळ प्राधिकरणात जम्बो भरती सुरु, तब्बल इतका पगार मिळेल

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आलीय.विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरतीद्वारे विविध पदाच्या 490 जागा भरल्या जातील. चला तर मग आता उशीर कशाला करता ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल 2024 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

रिक्त पदाचे नाव :
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी-सिव्हिल): 90 पदे
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल): 106 पदे
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स): 278 पदे
कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर): 03 पदे
कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान): 13 पदे

भरतीसाठी पात्रता
कार्यकारी (अभियांत्रिकी-सिव्हिल): उमेदवार सिव्हिलमधील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवीधर असावेत.
एक्झिक्युटिव्ह (इंजिनीअरिंग-इलेक्ट्रिकल): उमेदवारांकडे इलेक्ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवी असावी.
कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स): कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार किंवा इलेक्ट्रिकलमध्ये तज्ञ असणे आवश्यक आहे.
एक्झिक्युटिव्ह (वास्तुविशारद): उमेदवार पदवीधर असावा आणि वास्तुविशारद परिषदेत नोंदणीकृत असावा.
कार्यकारी (संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान): कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
जे उमेदवार या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करत आहेत, त्यांची कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असावी. १ मे पासून वयोमर्यादा मोजली जाईल. याशिवाय सरकारी नियमांनुसार वयातही सवलत दिली जाणार आहे.

वेतन
AAI भरती अंतर्गत या पदांसाठी कोणते उमेदवार निवडले जातील, त्यांना पगारासह 40,000 रुपये आणि 3% वाढीसह 1,40,000 रुपये दिले जातील.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा