भुसावळ : मध्य रेल्वे दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मोठ्या मागणीचा आणि सणाच्या काळातील अतिरिक्त गर्दीचा विचार करून दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या होणार आहे. ०१२०९ विशेष गाडी ही २६ ऑक्टोबर आणि ९ नोव्हेंबर रोजी प्रत्येक शनिवारी नागपूर येथून संध्याकाळी ७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पुणे येथे पोहोचेल. ०१२१० विशेष गाडी २७ ऑक्टोबर आणि १० नोव्हेंबर रोजी प्रत्येक रविवारी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी उरली, दौंड कॉर्डलाईन, नगर, बेलापूर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा येथे थांबणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-नागपूर विशेष गाडीच्या चार फेया होतील. ०२१३९ विशेष गाडी ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबरला लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
०२१४० विशेष गाडी १ व ८ नोव्हेंबर रोजी नागपूरहून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, वर्धा येथे थांबेल.
मुंबई-आगरतळा साप्ताहिक गाडी
मुंबई-आगरतळा साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेया होतील. ०१०६५ विशेष गाडी ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबरला मुंबई येथून सकाळी ११.५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १.१० वाजता आगरतळा येथे पोहोचेल. ०१०६६ विशेष गाडी ३ व १० नोव्हेंबरला आगरतळा येथून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ३.५० वाजता मुंबई येथे पोहोचेल. ही गाडी भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, खंडवा येथे थांबणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशसानाने केले आहे.
पुण्यासाठी विशेष गाड्या
पुणे-दानापूर या विशेष गाडीच्या २८ फेऱ्या होतील. यात ०१२०५ विशेष गाडी २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत प्रतिदिन पुणे येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता दानापूरला पोहोचणार आहे. ०१२०६ विशेष गाडी २७ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत रोज दानापुरहून सकाळी ५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोचेल. ही गाडी दौंड कॉर्डलाईन, नगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा येथे थांबेल. पुणे-गोरखपूर विशेष गाडीच्या ४२ फेया होतील. ०१४१५ विशेष गाडी दि. २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेबरपर्यंत रोज पुणे येथून सकाळी ६.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता गोरखपूरला पोचेल. ०१४१६ विशेष गाडी दि. २३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेबरपर्यंत रोज गोरखपूरहून संध्याकाळी ५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ३.१५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, नगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, कानपूर, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे.