नवी दिल्ली । महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.त्यातच देशातील जनतेला दिलासा देणारा आणखी एक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तो म्हणजेच लवकरच खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सरकारने सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावरील मूलभूत आयात शुल्क १७.५ टक्क्यांवरून कमी करून १२.५ टक्के केले आहे. सुधारित आयात शुल्क ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.
भारताची पामतेल आयात मे महिन्यात १४.५९ टक्क्याने कमी होऊन ४ लाख ३९ हजार १७३ टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आहे, अशी माहिती सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) गुरूवारी दिली. मागील वर्षी मे महिन्यात पामतेलाची ५ लाख १४ हजार २२ टन आयात झाली होती.
दरम्यान, यावर भाष्य करताना, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) चे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता म्हणाले की, या निर्णयाचा बाजारातील भावनांवर काही तात्पुरता परिणाम होऊ शकतो परंतु आयात आकर्षित होण्याची शक्यता नाही. “मुळात, सरकारला खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात ठेवायच्या आहेत.