नवी दिल्ली : तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज जाहीर झालेल्या दरानुसार व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे.दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
आजच्या किमतीत कपात केल्यानंतर, 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता मुंबईत 1960.50 रुपये, कोलकाता 1960.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2021.50 रुपये आहे.
दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 1,856.50 रुपये आहे. या सिलिंडरची किंमत 171.50 रुपयांनी कमी झाली आहे. यापूर्वी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 2,028 रुपयांना मिळत होता.
मात्र, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरची शेवटची वाढ 1 मार्च रोजी 50 रुपयांनी करण्यात आली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत रु.1103.00 आहे.