गंभीर फार काळ टिकू शकणार नाही, कारण… वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरलेल्या खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती झाली असून, त्यांनी श्रीलंका दौऱ्यापासून संघाची कमान सांभाळली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यामुळे गौतम गंभीरने आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीतील पहिल्या मालिका विजयाची चव चाखली. अशातच टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरलेल्या एका खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य व्हायरल होत आहे. त्याच्या मते गौतम गंभीर टीम इंडियाला सांभाळू शकतो, पण इथे फार काळ टिकणार नाही.

गौतम गंभीरसंदर्भात वक्तव्य करणारा खेळाडू 2007 मधील T20 वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य होता. विजय झालेल्या भारतीय संघातील हिरो होता. त्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीर याचा सहकारी सदस्य होता. जोगिंदर शर्मा यांच्या वक्तव्यानुसार, मी गौतम गंभीरला चांगलेच ओळखतो. त्याचा स्वभाव पहिल्यास तो जास्त दिवस भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करु शकणार नाही.

गंभीरवर दिलेल्या वक्तव्यामागे 3 कारणे
जोगिंदर शर्मा यांचे हे आश्चर्यकारक विधान सोशल मीडियावर वेगाने जोर धरत आहे, त्यामागे त्यांनी 3 कारणे दिली आहेत.  त्यांच्या मते गौतम गंभीर याचे काही निर्णय असे असतात की ते अनेकांना आवडत नाही. कारण तो सरळ बोलतो, रोखठोक बोलतो. गौतम गंभीर कोणाजवळ जात नाही. त्याला चापलूसी करणे जमत नाही. त्याची तशी सवय नाही.
गौतम गंभीर आपल्या कामाशी काम ठेवतो. तसेच कधी क्रेडीट घेण्याच्या फंद्यातही पडत नाही.

राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर  
राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरने टीम इंडियात स्थान मिळवले आहे. T20 विश्वचषक 2024 मधील विजयासह राहुल द्रविडचा टीम इंडियाचा कार्यकाळही संपुष्टात आला, त्यानंतर गौतम गंभीरकडे जबाबदारी आली. सध्या, भारतीय संघ गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे, जिथे एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर गंभीरचे लक्ष वनडे मालिकेवरही आहे.