श्रीहरीकोटा | भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. ‘टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी१) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज १० वाजता करण्यात आले. ‘गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिल्याच प्रयत्नात खराब हवामानामुळे भारताला अपयश आलं. पण शास्त्रज्ञ निराश झाले नाही. चंद्राला गवसणी घालणाऱ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरूच ठेवले अन् अवघ्या दोन तासात दुसऱ्यांदा चाचणी घेतली आणि गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली. क्रू मॉड्यूलचं बंगालच्या खाडीत यशस्वी लँडिंग झालं. हे लँडिंग होताच श्रीहरीकोटीतील सतीश धवन अंतराळ केंद्रातील शास्त्रज्ञच नव्हे तर देशभरातील नागरिकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.
गगनयान मिशनमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे. गगनयान मिशन यशस्वी झाल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन यशस्वी होताच शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. टीवी-डी-1 बूस्टरच्या मदतीने हे लॉन्चिंग केलं गेलं. श्रीहरीकोटातून यानाने उड्डाण घेतलं आणि बंगालच्या खाडीला स्पर्श केला म्हणजे बंगालच्या खाडीत यशस्वी लँडिंग झालं. भारत गगनयान मिशन 2025 ची तयारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे लँडिंग केलं जात आहे.
सुरुवातीला तांत्रिक बिघाड पण…
सकाळीच 8 वाजता हे मिशन पूर्ण केलं जाणार होतं. पण त्यावेळी तांत्रिक बिघाड आणि हवामानातील बदलामुळे उड्डाण होऊ शकलं नाही. टेस्ट व्हेईकल पूर्णपणे सुरक्षित होतं. पण इंजिन वेळेत सुरू झालं नाही. त्यामुळे त्यातील तांत्रिक कारणांचा शोध घेण्यात आला आणि 10 वाजेच्या आधीच उड्डाण करण्यात आलं. हे उड्डाण यशस्वी होताच सतीश धवन अंतराळ केंद्रात एकच जल्लोष झाला.
Mission Gaganyaan
TV D1 Test Flight is accomplished.
Crew Escape System performed as intended.
Mission Gaganyaan gets off on a successful note. @DRDO_India@indiannavy#Gaganyaan
— ISRO (@isro) October 21, 2023