गणेश विसर्जन! तैनात तरुणावर अचानक वीज कोसळली, रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्यभरात आज मनोभावे पूजा केलेल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन केलं जात आहे. लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहे. त्यासाठी मोठी तयारीही केली जात आहे. अशातच गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली आहे

मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक जमा झाले आहेत. अनेक गणपती मंडळानी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येण्यास सुरुवात केलीये. यावेळी एक तरुण जुहू किनाऱ्यावर तैनात करण्यात आला होता. त्याच्यावर वीज कोसळल्याची घटना घडली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तरुणावर वीज पडल्याची घटना घडल्याने पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.