जळगाव : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत आणि उत्साहात झाली. भक्तीपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला.
बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु असताना दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, विसर्जन मिरवणूक अजूनही पूर्ण झालेली नाही.
आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन करणार नाही, अशी भूमिका १८ गणेश मंडळांनी घेतली आहे. त्यामुळे गणेश मुर्तीच विसर्जन झालेलं नाही.
बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये काही समाज कंटकांनी विसर्जन मिरवणूक सुरु असताना दगडफेक केली. त्यामुळे तणाव इतका वाढला की, पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही महिला जखमी झाल्या आहेत. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.