नवी दिल्ली । देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या स्थितीत कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच दरम्यान गव्हाच्या किंमती वाढू नये म्हणून सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
सध्या गव्हाच्या दरात वाढ होत असताना या पार्श्वभूमीवर सरकारनं किंमती वाढू नयेत म्हणून खबरदारी घेतलीय. सरकार गहू आणि तांदळाच्या साठ्यावर लक्ष ठेऊन आहे. गव्हाची साठवणूक करु नये, साठवणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती सरकारला देणं बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गव्हाच्या किंमती वाढू नयेत म्हणून सरकारनं गहू साठा मर्यादा लावली होती. या साठा मर्यादेची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्यामुळं गव्हाचा साठा करुन दर वाढण्याची शक्यता आहे. अशातच सरकारनं साठा जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. यामुळं गव्हाच्या किंमती निंयत्रीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयानं एक परिपत्रक देखील जाहीर केलंय.