---Advertisement---

गांजाची नशा पडली महागात, तिघांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

भुसावळ : गांजाचा नशा करणाऱ्या तीन जणांविरोधात बाजारपेठ पोलीसांनी २१ फेब्रुवार, रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. याप्रकरणी गुरूवार, २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

भुसावळ शहरातील खडका रोडवरील ईदगाहच्या बाजूच्या परिसरात काही जण बेकायदेशीररित्या चिलीममधून गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणदिवे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईबाबत सुचना दिल्या. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथकाने बुधवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत संशयित आरोपी सलमान शेख सलिम शेख वय २०, युनुस हमीद शेख वय ४८ आणि करीम नुर मोहम्मद शेख वय-५६ तिघे रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ गांजाचा नशा करतांना रंगेहात पकडले.

याप्रकरणी गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ नेव्हिल बार्टले, पोहेकॉ गणेश चौधरी आणि पोहेकॉ भूषण जैतकर हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment