भुसावळ : गावठी कट्टे बाळगून दहशत निर्माण करणार्या त्रिकूटाला भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकर नगर, साकेगाव, ता.भुसावळ) व विकास पांडुरंग लोहार (30, श्रीराम नगर, साकेगाव, ता.भुसावळ) व जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडित (26, वाल्मीक नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असून संशयितांकडून दोन गावठी कट्टे, जिवंत काडतूस व दोन चॉपर जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी आदींच्या पथकाने केली.