भुसावळ : गावठी पिस्टलासह भुसावळात पकडण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सागर बबन हुसळे (26, भगवान सावळे नगर, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. ही कारवाई सोमवार, 12 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झेडटीएस भागात करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना भुसावळातील संशयिताकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संशयिताला फेकरी शिवारातील झेडटीएस भागातून अटक करण्यात आली. संशयिताच्या अंग झडतीत 20 हजार रुपये किंमतीचे पिस्टल आढळल्याने ते जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रवी नरवाडे, नाईक रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, चालक प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली.