---Advertisement---

गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड, बाराशे लिटर कच्चे रसायन नष्ट

---Advertisement---

जामनेर : तालुक्यातील पाळधी शिवारात गावठी हातभट्ट्यांवर पहूर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी बाराशे लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट केले. या कारवाईमुळे पाळधी गावात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील पाळधी शिवारातील वाघूर नदीकाठी ईश्वर झिप्रू भोई, कैलास झिप्रू भोई यांचे गावठी हातभट्टीवर कारवाई करून अंदाजे बाराशे लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट केले. या कारवाईमुळे पाळधी गावात खळबळ उडाली आहे. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय सुस्ते, पोलीस कॉन्स्टेबल ढाकरे ,गोपाल माळी, राहुल पाटील ,हेमंत सोनवणे यांनी ही कारवाई केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment