जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यासोबतच त्यांच्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवेत त्यांच्यासोबत काम करणारे आरोग्यदूत पहेलवान शिवाजी रामदास पाटील यांनी त्यांच्या हृदयावर टॅटू बनवून आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबत शिवाजी पाटील यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, ना. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून आरोग्यसेवेत कार्यरत आहे. गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना अनेक गोरगरीब नागरिकांचा सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. आज त्यांचा वाढदिवस असल्याने माझं दैवत तसेच मार्गदर्शक प्रेरणास्थान म्हणून मी त्यांचे चित्र माझ्या हृदयावर रेखाटले आहे. आई-वडिलांनंतर मी सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्व व दैवत म्हणून त्यांना मानतो. म्हणूनच मी आज माझ्या हृदयावर त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, 17 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी पाच व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. मंत्री महाजन यांचा वाढदिवस सेवा पद्धतीने कार्यकर्त्यांनी साजरा केला. मनोकल्प प्रतिष्ठानचे मनोज वाणी यांच्यातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक म्हणून पाच व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. धर्मेंद्र पाटील, आरोग्यदूत शिवाजी पाटील, मनोज वाणी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.