गुजरातमधील वलसाडमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग; सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। गुजरात मुधुन एक धक्कादायक बातमी समोर येतेय. गुजरातमधील वलसाड येथे शनिवारी दुपारी २:२० च्या सुमारास तिरुचिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसच्या ब्रेक व्हॅन कोचमध्ये भीषण आग लागली. ट्रेन क्रमांक २२४९८ च्या प्रवाशांना डब्यात धूर दिसल्याने ही घटना उघडकीस आली. सर्व प्रवाशांना शेजारील डब्यातून सुखरूप खाली उतरवण्यात आले असून, सध्या कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जात होती. प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याआधी गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या मदुरै रेल्वे स्थानकावर रामेश्वरला जाणाऱ्या रेल्वे गाडीला आग लागली होती. लखनऊ येथून रामेश्वरला जाणाऱ्या भारत पर्यटक ट्रेनला २६ऑगस्टला आग लागली होती. या आगीत १० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता गुजराच्या वलसाड जिल्ह्यात रेल्वेला आग लागल्याची घटना घडलीय.