जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी गुडन्यूज आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत प्रचंड चढउतार पाहायला मिळाले. दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. तसेच आता आज गुरुवारी सोन्याच्या किंमती घसरली आहे.यामुळे सोन्याचा भाव ६९ हजाराच्या घरात आला आहे.
जळगावात काय आहे भाव?
जळगावच्या सुवर्णपेठेत या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून सोने चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आज सोन्याच्या दरांमध्ये २०० रुपयांपर्यंत घसरल्यामुळे सोन्याचा भाव ६९,८०० रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या आलेल्या किंमतीनुसार, आज १ किलो ग्राम चांदीचा भाव १०० रुपयांनी घसरून ८१,९०० रुपये इतका आहे
सध्या सोन्याच्या किंमत सातत्याने घसरत असल्याने सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक जणांनी दागिने खरेदी करत सोने-चांदीमधील गुंतवणूक आणखी वाढवली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात तेजीचे संकेत असताना सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यापेक्षा चांदी अधिक घसरली आहे. गेल्या १५ दिवसांत चांदी ९ हजारांनी स्वस्त होऊन ८२ हजार रुपये (जीएसटीसह ८४४६०) किलोपर्यंत खाली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केल्याने दोन्ही धातूंच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आगामी सणासुदीच्या काळात सोने चांदीचे दर वाढतात कि कमी होतात? याकडे ग्राहकांचं लक्ष लागून आहे.