---Advertisement---

गुड न्यूज; सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होणार बंपर वाढ

---Advertisement---

नवी दिल्ली : मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. प्राप्त माहितीनुसार, २०२३ च्या दुसर्‍या सहामाहीत डीएमध्ये वाढीसोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही फायदा करण्याची शक्यता आहे. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीची घोषणा झाली तर कर्मचार्‍यांच्या बेसिक पगारावर त्याचा परिणाम दिसून येईल. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच होईल, अशी चर्चा आहे.

४२०० रुपये ग्रेड पेवर कर्मचार्‍याला बेसिक सॅलरी १५,५०० रुपये मिळते. त्याप्रमाणे एकूण पगार १५,५००*२.५७ रुपये म्हणजेच ३९.८३५ रुपये असेल. सहामाहीत फिटमेंट फॅक्टरमध्ये १.८६ टक्के वाढीची शिफारस आहे. कर्मचार्‍यांनी फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के करावा अशी मागणी वारंवार केली. जर यात वाढ झाली तर सध्याचे किमान वेतन १८ हजाराहून वाढून २६ हजारांपर्यंत पोहचू शकते.

याशिवाय सरकार दुसर्‍या सहामाहीसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई दिलासा (डीआर) चार टक्क्यांनी वाढवू शकते. सरकारने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डीए आणि डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. आता पुन्हा चार टक्के वाढ झाल्यास डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल आणि कर्मचार्‍यांच्या पगारातही वाढ होईल. केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए ४६ टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment