---Advertisement---

गुन्हेगार चले जाव ! जळगाव पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

---Advertisement---

भुसावळ : जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी कलम 55 अन्वये दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून ईरफान हबीब तडवी (21), जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (20) व शब्बीर रमजान तडवी (22, तिन्ही रा.पिंप्री, ता.रावेर) या संशयितांना हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुन्हेगारांना दोन वर्ष जिल्हा बंदी
टोळी प्रमुख ईरफान तडवीसह तिघांविरोधात चोरी केल्याप्रकरणी रावेर पोलिसात तीन गुन्हे दाखल असून संशयित टोळीने राहून वारंवार गुन्हे करीत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत रावेर पोलिसांनी प्रस्ताव सादर केल्याने फैजपूर उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी प्रस्तावाची चौकशी करून तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. जिल्हा पोली अधीक्षकांनी तिघांना मुंबई पोलीस कायदा कलम 55 दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment