तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। ज्योतिशास्त्रानुसार अनेक ग्रह काही कालावधीनंतर राशीबदल करत असतात. गुरु आणि राहुची अभद्र युती झाली होती. त्यामुळे अशुभ असा गुरु चांडाळ योग तयार झाला असून हि युती संपणार आहे. गुरु आणि राहुची युती तुटताच गुरु चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. पुढचे काही महिने काही राशींसाठी शुभ असणार आहे तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या काळात मेष राशींच्या लोकांसाठी विशेष लाभदायक असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची चिन्हे आहेत. अविवाहित जातकांना चांगलं स्थळ मिळू शकते. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतात. काही दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल.आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
कुंभ रास
या काळात कुंभ राशींच्या लोकांची व्यवसायात प्रगती होईल. करियर मध्ये येणारे अडथळे दूर होतील. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.