गुलमर्ग : जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये हिमस्खलन झाल्याची घटना समोर येत आहे. यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून १९ परदेशी पर्यटकांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळतेय. तर बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधला राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय.
बारामुल्ला पोलिसांनी सांगितले की, ‘गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टच्या वरील भागात असणाऱ्या अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले आहे. सध्या बारामुल्ला पोलिसांसह इतर यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच काही स्कीअर अडकल्याचे सांगितले जात आहे.