गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडले ! पंधरा दिवसात खाद्यतेल ‘इतक्या’ रुपयांनी महागले

Pouring food oil in hot pan for deep frying.

जळगाव । गेल्या काही दिवसापासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होताना दिसून आले. यामुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडले आहे. देशात तेलाच्या दरात प्रतिकिलो १०ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आयातशुल्क कमी केले असले तरीही दरवाढ कायम आहेत. मार्चपर्यंत दरवाढ लागू राहाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, होळी आणि रमजान महिन्यामुळे पाम तेलाचे दर मलेशिया देशातच महाग झाले आहेत. रमजान ईद साजरी होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाहीच. ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी होतील. पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम सर्व तेलाच्या दरवाढीवर झाल्याने लोकांना सध्यातरी जास्त दरातच खाद्यतेल खरेदी करावे लागेल.

खाद्यतेल सध्या १५ दिवसांआधी
सोयाबीन ११५ १०५
पाम ११५ १००
राईस ११२ १००
सूर्यफूल ११५ १०५
शेंगदाणा १७६ १७२
मोहरी १३० १२०
जवस १२० १२०
वनस्पती १३० ११५