जळगाव । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना केंद्र सरकारने तेलावरील एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे खाद्यतेलाचे दर भडकले आहे. गेल्या आठवड्यात ११० रुपये किलो असणारे सोयाबीन तेल १२५ रुपयांवर पोचले होते. मात्र आता पुन्हा यात वाढ झाली असून सोयाबीन तेलाचे दर शुक्रवारी १३० रुपयांवर पोचले आहे.
सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात खाद्यतेल आयात शुल्कावर २० टक्क्यांनी वाढ केली असून आता कच्चे सोयातेल, पामतेल व सूर्यफूल तेल यावर २७.५ टक्के आयात शुल्क लागणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या आठ्वड्यात खाद्यतेलाची भाव २० ते २५ रुपयांनी वाढले होते.
त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत सोयाबीन तेलाचे भाव १२५ रुपयापर्यंत होते. मात्र काल त्यात पुन्हा ५ रुपयापर्यंतची वाढ झाली. यांनतर सोयाबीन तेलाचे दर आत १३० रुपयांवर पोचले आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होत असते. मात्र यंदाच्या वर्षी सरकारने खाद्यतेल महाग होणार नाही याची काळजी घेतली आहे.कमी बेसिक कस्टम ड्युटीवर आधीच आयात केलेल्या सुमारे 30 लाख टन तेलाचा साठा आहे, जो 45 ते 50 दिवसांच्या घरगुती वापरासाठी पुरेसा आहे. त्यामुळेच सध्याचा साठा शिल्लक राहूपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नयेत अशा सक्त सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना दिल्या आहेत.