गोवा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन रद्द, हे आहे कारण

Goa-Mumbai Vande Bharat: गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा ओडिशात 3 गाड्यांना झालेल्या अपघातामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता उद्घाटनाची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

ओडिशातील कोरोमंडल एक्स्प्रेससह ३ गाड्यांना झालेल्या अपघातामुळे मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करणार होते.

गोवा वंदे भारत ट्रेन उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता यासाठी उद्घाटनाची नवी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. लवकरच त्याच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर केली जाईल.