तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। एका ठराविक कालावधीनंतर ग्रह भ्रमण करत असतात. आता अशीच काहीशी स्थिती राशीचक्रात तयार होत असून गृहलक्ष्मी शुभ योग तयार होत आहे. शुक्र, बुध आणि मंगळ हे ग्रह जेव्हा उच्च राशीत विराजमान असतात तेव्हा हा गृहलक्ष्मी योग तयार होतो. तर हा गृहलक्ष्मी योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
या काळात वृषभ राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. अनेक कामे विनाअडथळे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळताना दिसेल. तसेच नवे आर्थिक स्रोत या कालावधीत खुले होतील.
सिंह रास
या काळात सिंह राशींच्या लोकांना वाहन खरेदीचा योग जुळून येईल.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्यात सुधारणा होताना दिसून येईल.
कुंभ रास
या काळात सिंह राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. आरोग्यविषयक अडचणींवर तोडगा निघू शकतो. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल.