धरणगाव : तालुक्यातील डॉक्टर हेडगेवार नगर ग्रामपंचायतमध्ये काठेवाडी आपली गाई म्हशी घेऊन ओपन प्लेस जागेत अतिक्रमण केलेले आहे. त्यांना बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय आठ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
तालुक्यातील डॉक्टर हेडगेवार नगर ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून काठेवाडी आपली गाई म्हशी घेऊन ओपन प्लेस जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशन, तहसीलदार, प्रांत ऑफिस यांना निवेदन देण्यात आले मात्र त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी ग्रामपंचायत राहणाऱ्या ग्रामस्थ त्रस्त झाले असून काठेवाडी त्यांच्या बाबतीत तक्रार केल्यास ग्रामस्थांना दमदाटी करत आहेत.
सेवानिवृत् एक्स मॅन त्यांना समजायला गेले असता त्यांना सुद्धा त्यांनी शिवीगाळ केली. अनेक रहिवाशांना जो कोणी बोलायला गेला त्याला दादागिरी दाखवत आहे अशा उर्मट व दादागिरी वाल्यांचे कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या प्रसंगी पी एम पाटील,गोविंदा पाटील,सरपंच धनराज सोनवणे,चंदन पाटील,पिंटू पवार,अरुण महाजन,टोनी महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.