---Advertisement---

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव; अंगावर ट्रॅक्टर नेवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

---Advertisement---

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याचा राग आल्याने एकावर ट्रॅक्टर नेऊन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. याबाबत  गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथे रामेश्वर बाबुराव पाटील (४२) हे आपल्या परिवारास वास्तव्यास आहे. दरम्यान नुकतेच पहूरपेठ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात त्रस्त व्यक्तीचा पराभव झाला होता. याचा राग आल्याने त्रस्त व्यक्तीने रामेश्वर बाबुराव पाटील यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मोहसीन खान नवाब खान रा. मालेगाव जि. जळगाव यास सांगून ट्रॅक्टर क्र. (एमएच १८ बीजी ४१४२) ने अंगावर नेला.

दरम्यान, सोबत असलेल्या काही जणांनी त्याला ट्रॅक्टरला अडवण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपी मोहसीन खान नवाब खान याने न जुमानता समोर असलेल्या दुचाकीवर नेवून नुकसान केले. या प्रकरणी रामेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी  मोहसीन खान नवाब खान यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment