ग्रामपंचायत सदस्यास जातीवाचक शिवीगाळ, तब्ब्ल ४० दिवसानंतर ६ जणांवर ॲट्रॉसिटी दाखल

कासोदा : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु. ह. गावात सरपंच पदाच्या दावेदारीतून दोन गटात वाद उफाळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तब्बल ४० दिवसानंतर ५ जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत कासोदा पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एरंडोल तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

उत्राण गु.ह गावातील गवंती चीमा पाडवी उर्फ कविता नितीन महाजन (३०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की,  मी सन २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून  निवडणूक आल्यानंतर आम्ही अपक्ष सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे सुरुवातीचे अडीच वर्ष मनीषा वाघ यांना सरपंच पदासाठी व नंतरचे अडिच वर्ष मला सरपंच पद देण्याचे ठरले होते. त्यानंतर सुद्धा श्रीमती वाघ यांनी त्यांचा कार्याकाळ पूर्ण झाल्यानंतर परत सरपंच पदासाठी अर्ज सादर करुन पुन्हा निवडून आल्याने गावातील लोकांनी त्यांना व परिवर्तन पॅनल मधील ४ व अपक्ष ३ अश्या सदस्यांना तुम्ही गद्दारी केली, तुम्ही शब्दाला टिकले नाहीत, असे बोलण्याचे संशयित ६ जणांना जिव्हारी लागले.

दरम्यान, दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मी व माझे पति घरी असताना गावातीलच अनिल महाजन, योगेश महाजन, दिनेश सोनवणे, चंद्रकांत वाघ, हरेष पांडे, शरद वाघ सर्व रा. उत्राण गु.ह. ता. एरंडोल यांनी घराच्या बाहेर उभे राहुन मला अर्वाच्च व अश्लिल व हलक्या जातीची असल्याने तुझी लायकी आहे का सत्ता चालविण्याची ? मी भिल्ल पावरा जातीची असून अनुसुचीत जमातीची आहे हे त्यांना माहित असून सुद्धा मला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

त्यामुळे मला घरातून बाहेर निघण्यास लाज वाटत असून, माझी वरील सहा इसमांविरोधात कायदेशीर फिर्याद आहे. अशी फिर्याद कासोदा पोलिसांत ग्रामपंचायत सदस्या पिडीत विवाहित महिलेने दिली असून तिच्या फिर्यादीवरून अनिल महाजन यांच्यासाह इतर ५ जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे ह्या करीत आहेत.