मुंबई । मागील काही दिवसात सोन्यासह चांदीच्या कितमीत मोठी वाढ दिसून आली. या दरवाढीमुळे सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी एक नवीन उच्चांक गाठला. ऐन लग्नसराईत झालेल्या वाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली. दरम्यान, सध्या जागतिक बाजारात सोन्या-चांदीची हालचाल मंदावलेली दिसते. सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आज गुरुवारी सकाळी दोन्ही धातूंचे वायदे भावही घसरणीसह उघडले. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे 300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची घट झाली आहे.
सध्या भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,218 रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव 62,420 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 74,390 रुपये किलो झाला आहे.
MCX आणि परदेशी बाजारात सोन्या-चांदीची किंमत
जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बद्दल बोललो, तर सोने 0.12 टक्क्यांनी म्हणजेच 72 रुपयांच्या घसरणीसह 62,368 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरून 331 रुपयांनी 74,500 रुपये प्रति किलो झाला आहे.
दुसरीकडे, विदेशी बाजार यूएस कॉमेक्समध्ये, सोने 0.24 टक्क्यांनी घसरून प्रति औंस $ 4.90 प्रति औंस 2,042.90 रुपये झाले आहे. तर चांदीची किंमत 0.41 टक्क्यांनी घसरून $0.10 प्रति औंस $24.13 वर व्यवहार करत आहे.