ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्यात 6700 रुपयांची, तर चांदीत 13000 हजार रुपयांनी घट

मुंबई । या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांना मोठा दिलासा आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यावरून 6 टक्क्यापर्यंत कमी केली. यामुळे स्थानिक बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीत तब्बल 6700 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात 13000 हजार रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करतात तर तुमच्यासाठी ही अतिशय योग्य वेळ आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्याच्या घोषणेनंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत अधिकच मोठी घट झाली आहे.

सोने-चांदीचा आजचा दर पाहिला तर सोन्याच्या किंमतीत तब्बल 6700 रुपये प्रति 10 ग्रॅम घट झाली आहे. तर चांदीचा भाव हा प्रति किलो 13000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. इतकं स्वस्त सोनं-चांदी याआधी कधी झालं नव्हतं. त्यामुळे सोने-चांदीचा खरेदीचा विचार करत असाल तर ही वेळ अतिशय योग्य आहे.

सोने-चांदीचे आजचे दर किती?
सोन्याचा आजचा भाव सांगायचा तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 68131 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 62408 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तर चांदीचा दर हा सध्या 81271 रुपये प्रति किलो असा आहे.