ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीचा दर पुन्हा घसरला, पहा आजचे दर

जळगाव । ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सोन्या-चांदीचा दर पुन्हा घसरला आहे. पितृपक्षाचा काळ सुरु झाला असून या काळात दर घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

MCX वर काय आहे दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर आज सोमवारी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली. आज 2 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम किंचित 35 घसरण झालेली दिसून आली.  यामुळे सोन्याचा दर  57,096 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. MCX वर आज सोमवारी चांदीच्या दरात 730 रुपयाची घसरण झाली असून यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर 69,870 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किमतीत जवळपास 3000 रुपयाची घसरण झालीय. सध्या जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. तर एक किलो चांदीचा दर 70500 रुपयांवर आले आहे.