ग्राहकांसाठी गुडन्यूज! तीन दिवसात सोने 1050 रुपयाने तर चांदी 2000 रुपयांनी घसरली

जळगाव । गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली. सणासुदीच्या दिवसांनंतर लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतींनी आस्मान गाठले. गेल्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला. नवीन वर्षात दोन्ही धातूंची घौडदौड कायम होती. मात्र गेल्या तीन दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण नोंदविली गेली. भाव घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांना खरेदीसाठी लगबग करता येईल. सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी

जळगावमध्ये एका दिवसात सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात तब्बल 1000 हजार रुपयाची घसरण झाली. यामुळे जळगावात आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी 73000 रुपये प्रति किलोवर आला आहे.

दरम्यान, बुधवारी (3 जानेवारी) रोजी सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 64,150 रुपयावर विकला जात होता. तर चांदीचा दर 75000 रुपये किलोने विकला जात होता. त्यात गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 1050 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली. यामुळे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.