ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी झाली स्वस्त, पहा आजचे दर

मुंबई । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरु आहे. गेल्या महिन्यात सोने-चांदीच्या दरात 4 हजारांची वाढ झाली होती. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्यासह चांदीचा दर कुठंवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खूशखबर आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर घटताना दिसत आहेत.. आज 8 ऑक्टोबर रोजी, बुधवारी सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बाजारात ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.

काय आहे आजचा दर
गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 61,200 रुपये आहे. मंगळवारी हा दर 61,360 रुपये होता. त्यासोबतच 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 56,250 वरून 56,100 रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घसरण
सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 1000 रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 74,500 रुपयांवरून 73,500 रुपयांवर पोहोचला आहे.

जळगावमधील सोने चांदीचा दर
जळगावमध्ये गेल्या दोन तीन दिवसात सोन्याच्या दरात ५०० रुपयापर्यंतची घसरण झालेली दिसून येतेय. यापूर्वी सोमवारी (6 नोव्हेंबर) सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विनाजीएसटी 61700 रुपये प्रति तोळ्यापर्यंत होते ते आज सकाळच्या सत्रात विनाजीएसटी 61200 रुपयावर आले आहे. आज चांदीचा दर 71800 रुपये प्रति किलोवर आला आहे.