तरुण भारत लाईव्ह । नोकरी संदर्भ । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एकमोठी संधी चालून आलीय. SBI ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ही भरती ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांसाठी होणार आहे.
या भरतीद्वारे तब्बल 2000 जागा भरल्या जाणार आहेत. जे कोणी यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, ते SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 27 सप्टेंबर रोजी संपेल.
पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
वयोमर्यादा
जे उमेदवार SBI PO भर्ती 2023 साठी अर्ज करत आहेत, त्यांची वयोमर्यादा 1 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. याशिवाय सरकारी नियमांनुसार श्रेणीनिहाय वयातही सवलत दिली जाईल.
SBI PO भर्ती 2023 अर्जाची लिंक
परीक्षा शुल्क
सामान्य / EWS / OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील आणि SC/ST/PWBD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.