---Advertisement---
बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तब्बल 3000 जागांसाठी भरतीची जाहिरात काढली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.
ही भरती ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी होणार असून पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2024 आहे. ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज फी: सामान्य, ओबीसी श्रेणीसाठी रु 800, SC, ST EWS श्रेणीसाठी रु 600, PH उमेदवारांसाठी रु 400 आणि सर्व महिला उमेदवारांसाठी रु 600.
अर्ज कसा करायचा
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, उमेदवार NATS मध्ये जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येतो. तुम्हाला अर्जासोबत विहित शुल्क जमा करावे लागेल, तरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल.
परीक्षा (Online): 31 मार्च 2024