ग्रॅज्युएट्स उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांवर जम्बो भरती
सरकारी बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी, Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि लिपिक या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमार्फ़त तब्बल 9995 जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची योजना आखणारे सर्व उमेदवार IBPS RRB, ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी आजपासून म्हणजेच ७ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
IBPS RRB भरतीद्वारे अनेक पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार 27 जून किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो.
रिक्त पदाचा तपशील :
1) ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
2) ऑफिसर स्केल-I 3499
3) ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
4) ऑफिसर स्केल-II (IT) 94
5) ऑफिसर स्केल-II (CA) 60
6) ऑफिसर स्केल-II (Law) 30
7) ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
8) ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
9) ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
10) ऑफिसर स्केल-III 129
अर्ज शुल्क :
पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
जाहिरात (Notification): पाहा