बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठी संधी चालून आलीय. कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही भरती शिकाऊ पदांसाठी होणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल.अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराला nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल.
देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 3000 शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. ज्यामध्ये 1302 पदे सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 740 पदे OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी, 479 पदे SC, 184 पदे ST, 295 पदे EWS आणि 112 पदे PwBD साठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
आवश्यक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयाची अट काय?
उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 1996 पूर्वी आणि 1 सप्टेंबर 2004 नंतर झालेला नसावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागणार नाही.
ॲप्रेंटिसशिप दरम्यान उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल.