ग्रॅज्युएट्स पाससाठी आनंदाची बातमी! IDBI मध्ये 2100 जागांसाठी पदभरती सुरु

बँकेत नोकरीच्या संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2100 पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन तपशील तपासू शकतात.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे. आणि हो अर्ज करण्याची अंतिम मुदत ही ६ डिसेंबरपर्यंत असणार आहे.

कोणती पदे भरली जाणार?

या भरतीमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदाच्या 800 जागा रिक्त आहेत. तर एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) पदाच्या 1300 जागा भरल्या जातील.

शैक्षणिक पात्रता:
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

वयोमर्यादा: या पदांसाठी वयोमर्यादा किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असेल. तुमचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 पूर्वी आणि 1 नोव्हेंबर 2003 नंतर झालेला नसावा. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी वयात पाच वर्षांची आणि ओबीसींसाठी तीन वर्षांची सूट दिली जाईल.
अर्ज फी
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आहे (फक्त सूचना शुल्क), तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाइन चाचणी, शैक्षणिक प्रमाणपत्र, वैयक्तिक मुलाखत आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online