बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. नोंदणी लिंक आजपासून म्हणजेच 13 जुलै 2023, सुरु झाली असून अर्ज करण्यासाठी, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in. वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलैपर्यंत आहे.
या भरतीद्वारे एकूण 400 पदे भरली जातील. इतर तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
या पदांसाठी होणार भरती?
या भारतीद्वारे 100 पदे अधिकारी श्रेणी III ची आणि 300 पदे अधिकारी श्रेणी II ची आहेत.
पात्रता काय?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, अधिकारी स्केल III साठी वयोमर्यादा 25 ते 38 वर्षे आहे आणि अधिकारी स्केल II साठी वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे निश्चित केली आहे.
निवड कशी होईल
या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ते त्यांच्या क्रमवारीनुसार 1:4 च्या प्रमाणात असेल. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीसाठी 150 आणि 100 गुण निश्चित केले आहेत. ते 75:25 च्या प्रमाणात पाहिले जातील.
सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्ज शुल्क 1180 रुपये आहे. आरक्षित श्रेणीसाठी शुल्क 118 रुपये आहे.