घटस्फोटात मिळालेल्या पैशातून घालते महागडे कपडे ? भडकली अभिनेत्री

---Advertisement---

 

मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज खानने शुरा खानशी लग्न केले आहे. मलायका-अरबाजच्या घटस्फोटाला बरीच वर्षे उलटली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य अजूनही चर्चेत आहे. तिनं अरबाजकडून घटस्फोट घेताना त्याच्याकडून खूप पैसे पोटगी म्हणून घेतले असतील. असे मलायकाबाबत बोलले जायचे. तब्बल सात वर्षानंतर मलायकानं जो खुलासा केला आहे त्यातून तिनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

लोकांना असे वाटते की, मी जेव्हा अरबाजकडून घटस्फोट घेतला तेव्हा मला खूप सारे पैसे पोटगी म्हणून मिळाले. हे लोकांना कुठून आणि कसं कळतं हेच मला कळत नाही. पिंकव्हिलाला दिलेली ती मुलाखत आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

मी कधीही माझ्या कुटूंबावर पैशासांठी दवाब आणला नाही. तसेच मी कधीही पैशांसाठी कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही. मला लग्नासाठी कुणी फोर्स केलेला नव्हता. मी माझ्या मनानं काही निर्णय घेतले होते. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात जे काही होते आहे त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज होती. ती जबाबदारीही मी घ्यायला हवी. अशा शब्दांत मलायकानं तिची भूमिका मांडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---