एरंडोल : घरात एकटी असल्याचा फायदा घेत नात्यातीलच एकाने विवाहितेवर जबरी अत्याचार केला. एरंडोल तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील सासर असलेल्या विवाहितेचे माहेर नागपूर येथे आहे. तिच्याच नातेवाईक असलेला संशयित हा देखील सासरच्या गावात राहतो. दरम्यान विवाहिता लग्नानंतर सासरी येथे नांदत असताना संशयित आरोपी हा देखील घराजवळ राहत होता. त्यावेळी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता.
दरम्यान, एके दिवशी विवाहिता घरी एकटी असताना संशयित हा जेवणासाठी विवाहितेच्या घरी गेला होता. त्यावेळी विवाहिता एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने तिच्या पतीला सांगितला, मात्र पतीने काहीही एक न ऐकता विवाहितेला माहेरी पाठवून दिले.
दरम्यान, संशयित आरोपीने विवाहितेला फोन करून ‘गावाकडे ये नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता कासोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग पवार हे करीत आहे.