धुळे : घराला अचानक लागलेल्या आगीत भावासह बहिणीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील लोणखेडी येथे घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली. आगीचे कारण समजू शकले नाही.
धुळे तालुक्यातील लोणखेडी या गावात नाना पवार हे परिवारासह एका झोपडीत वास्तव्यास आहेत. शेतमजुरी करून परिवार आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शेतीच्या कामासाठी परिवार घराबाहेर होता.
यावेळी झोपडीत नाना पवार यांचा मुलगा अमोल पवार (वय ७) आणि रिना पवार (वय ४) हे भाऊ- बहीण खेळत होते. तर त्यांची आजी सताबाई जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या.
जनावरांना पाणी पाजल्यानंतर त्या झोपडीकडे आल्या असता, त्यांना झोपडीला आग (fire) लागल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केली. झोपडीत माझी नातवंडे असल्याचे त्यांनी सांगितले.