---Advertisement---

घराला अचानक लागली आग; घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक

---Advertisement---

धडगाव : तालुक्यातील नंदलवड येथील एका घराला अचानक आग लागल्याने घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. परिणामी कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान,शासनाने  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसाग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

धडगाव तालुक्यातील नंदलवड येथील माज्या सजा वळवी यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने माज्या सजा वळवी यांच्या कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आगीत संपूर्ण घर आणि घरातील अन्नधान्य, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून राख झाल्याने माज्या सजा वळवी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment