घरीच बनवा ढाबा स्टाईल शेवभाजी

तरुण भारत लाईव्ह । ७ सप्टेंबर २०२३। रोज रोज जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर अशावेळी तुम्ही ढाबा स्टाईल शेवभाजी करू शकता. ढाबा स्टाईल शेवभाजी घरी करायला खूप सोप्पी आहे. चला तर जाणून घेऊयात ढाबा स्टाईल शेवभाजी यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
कांदा, टॅमोटो, भाजीची तिखट शेव, आलं लसूण पेस्ट, मिरची, लाल तिखट, धने पावडर, जिरे, मोहरी, हळद, तेल आणि मीठ

कृती
सर्वप्रथम एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी आणि जिरे घाला यानंतर त्या कढई मध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टॉमॅटो घालून परतून घ्यावा. यानंतर त्यामध्ये  हळद,लाल तिखट, कोथिंबीर, धने पावडर आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत परतुन घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात दोन लहान चमचे शेव टाकून घ्यावी. सगळयात शेवटी या मिश्रणात दोन वाट्या गरम पाणी गेला.गरम पाणी घातल्याने रश्श्याला लाल तर्री येईल. तयार आहे ढाबा स्टाईल शेवभाजी.