चंद्रकांत पाटलांचा वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले, वाचा कोण काय म्हणाले…

मुंबई : बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का? असा सवाल देखील त्यांनी केला होता. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.

यावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मिंधे जे तिथे बसले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा नकोच पाटलांची हकालपट्टी करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

राम मंदिरातचा निकाल कोर्टाने दिला, त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये. हे उंदीर आता बिळातून बाहेर पडत आहेत. स्वत: अडवाणी म्हणाले होते, बाबरी पाडणारे लोक मराठी बोलत होते, ते कोणाचे ऐकायला तयार नव्हते आणि आता पाटील म्हणतात की शिवसेना नव्हती. बाळासाहेबांनी देखील आम्हीच बाबरी पाडल्याचे म्हटले होते, असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी दिले आहे.