Chandrayaan 3 Mission : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISROने आपल्या चंद्रयान 3 मिशनची घोषणा केली आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले एस सोमनाथ?
येत्या जुलै महिन्यात चंद्रयान 3 मिशनला सुरु केली जाणार आहे, असं एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे.चंद्रयान – 2 च्या अपयशानंतर चंद्रयान – 3 मिशन सुरु करण्यात येणार आहे. चंद्रयान-3 हे चंद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 द्वारे यांचं लॉन्चिंग केले जाईल. एस सोमनाथ यांनी चंद्रयान मिशनच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
त्यांनी म्हटलं की, आजचे यश GSLV F10 च्या अपयशानंतर आले आहे. क्रायोजेनिक स्टेजमधील सुधारणा आणि अपयशातून घेतलेल्या धड्याचा खरोखरच फायदा झाला आहे. समस्या सोडवण्याचे श्रेय त्यांनी ‘फेल्युअर अॅनालिसिस कमिटी’ला दिले. इस्रोच्या वैज्ञानिकांनी आज जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलद्वारे नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 लाँच केला. आज सकाळी 10.42 वाजता ते आपल्या लक्ष्याच्या दिशेने रवाना झाले. अंतराळ क्षेत्रातील भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल, असंही एस सोमनाथ म्हणाले.