जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा झाली होती. या पार्श्वभूमीवर चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे नेते चंपाई सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.