चटपटीत टॉमॅटो चाट रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। चाट खायला तर जवळपास सगळ्यांनाच आवडत. सुट्टीच्या दिवशी काही लोक संध्याकाळच्या वेळेला चाट खाण्याचा आनंद घेत असतात. पण एखाद्यावेळेला जर बाहेर जाऊन चाट खायला जायचा कंटाळा आला तर तुम्ही चाट घरी सुद्धा बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहोत जी घरी बनवायला खूप सोप्पी आहे. चला तर पटकन नोट करा टोमॅटो चाट रेसिपी.

साहित्य
चिरलेला टोमॅटो, उकडलेले वाटाणे, उकडलेला बटाटा, चिरलेला कांदा, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस, काश्मिरी लाल तिखट काळे मीठ, जिरे पावडर, गरम मसाला, चिंचेची चटणी,  कोथिंबीर चटणी, मीठ, तेल.

कृती
सर्वप्रथम,टोमॅटो चाट बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्या. त्यात आले, हिरवी मिरची आणि कांदे घालून कांदे  परतून घ्या. नंतर टोमॅटो आणि १/२ टीस्पून मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा. नंतर त्यात गरम मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, जिरेपूड टाकून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.

नंतर त्यात बटाटे घालून दोन मिनिटे परतून घ्या. यानंतर उकडलेले वाटाणे, अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर दोन मिनिटे शिजवा. यानंतर हिरवी चटणी, आंबट गोड चटणी, हिरवी धणे आणि चवीनुसार काळे मीठ घालून गॅस बंद करा. आता तयार केलेले साहित्य प्लेटमध्ये ठेवा, नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि हिरवी कोथिंबीर घाला आणि गरम सर्व्ह करा.