चमचमीत डाळ वांगे रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। नेहमी तीच तीच वांग्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर वांग्याची भाजी हि वेगळ्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. डाळ वांगे असे या भाजीचे नाव आहे. तर हि भाजू कशी करावी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
छोटी वांगी, तूर डाळ, टमाटर, लाल मिरच्या, फोडणीचं साहित्य, गरम मसाला, कोथिंबीर, तेल, मीठ

कृती
सर्वप्रथम वांगी धुवून घ्यावी त्यानंतर वांगीच्या गोलाकार भागावर + या आकाराचा छेद करावा, तुरीची डाळ अर्धा तास भिजवून ठेवावी यानंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये फोडणी घालावी. त्यानंतर त्यात तुरीची डाळ टाकावी. डाळ चांगली परतल्यावर त्यात गरम मसाला आणि बारीक चिरलेले टमाटर टाकावे.

चवीपुरतं मीठ टाकावं. त्यात वांगी टाकावी. डाळ वांगे शिजल्यानंतर सर्व्ह करण्यापूर्वी सुक्या लाल मिरच्यांचा तडका द्यावा आणि हा तडका डाळ वांगेवर टाकावा आणि वरुन कोथिंबीर टाकावी.