---Advertisement---

चरित्र्यावर संशय! नराधम पतीने मिरची पावडर हातात घेतली अन्… घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ

---Advertisement---

जळगाव : चरित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने पत्नीची निर्घृन हत्या केलीय. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संशयित आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारात ही घटना घडलीय. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात संशयित आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील रोहिणीभोईटी येथील राजेश जगन पावरा (बारेला, २८) हा आपल्या पत्नीसह चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारातील शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्याला होता.  गेल्या अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये चरित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता.

दरम्यान, २६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राजेश जगन पावरा याने पत्नी शिवानी हिची गुप्तांगात मिरची पावडर टाकून निर्घृन हत्या केली.  या घटनेने परिसरात  खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहूणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी राजेश जगन पावरा याला अटक केले आहे. याप्रकरणी रामेश्वर रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश जगन पावरा बारेला याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment